चिपळूण : १६ जुलै रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण शहरातील भोगाळे बस स्थानक ते चिंचनाका रोडवरील चिपळूण शॉपिंग बाजारसमोरील सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या एका बुलेटस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात पोहवा/१३३३ वैदेही वैभव सकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी राहुल भरत नेटके, रा. नांदगाव तर्फे बिरवाडी, नागलवाडी, कालभैरव नगर, रायगड, हा दारूच्या नशेत होता. त्याने आपली निळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. MH-06-CK-9412) रस्त्याच्या मधोमध लावली होती. त्याला समजावण्यासाठी जमलेल्या लोकांशी तो मोठ्या मोठ्याने बोलून आरडाओरडा करत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६४/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८५ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 17-07-2025













