नाटे सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक खेडकर यांची रत्नागिरी जिल्हा विशेष शाखेत बदली

राजापूर : नाटे सागरी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर यांची बदली रत्नागिरी जिल्हा विशेष शाखेत झाली आहे. त्यांच्या जागी एपीआय प्रमोद वाघ यांची नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रमोद वाघ यांना यापूर्वी रत्नागिरी एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) येथे काम करण्याचा अनुभव असून, गुन्हे अन्वेषणात त्यांचा ठसा उमटला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता सागरी पोलीस ठाण्याला मिळणार आहे.

याशिवाय या पोलीस ठाण्यात आणखी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून पोलीस दलात अनेक वर्षे सेवा बजावलेल्या झगडे यांना नुकतीच पदोन्नती मिळून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

आता नाटे सागरी पोलीस ठाण्यात एपीआय प्रमोद वाघ प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासोबत पीएसआय ठोंबरे व पीएसआय झगडे हे कायदा-सुव्यवस्थेच्या अधिकारी जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. नवीन अधिकारी वर्गाच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमता आणि प्रतिसादक्षमतेत आणखी वाढ होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

cake of the day

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 19/Jul/2025