विठ्ठल कदम यांच्या ‘चिमण कथा’ संग्रहाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश

सावंतवाडी : शिक्षक साहित्यिक तथा कुणकेरी शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक विठ्ठल नारायण कदम यांच्या ‘चिमण कथा’ या बालकथा संग्रहाची निवड राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषदेने (MSCERT) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शिक्षक लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषदेने ग्रंथ निर्मिती उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत विठ्ठल कदम यांचा ‘चिमण कथा’ हा बालकांच्या भावविश्वावर आधारित ४० कथांचा संग्रह शासनाने प्रकाशित केला आहे. हा कथासंग्रह आता महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयात उपलब्ध झाला आहे.

विठ्ठल कदम हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या बालकथा संग्रहाची राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 19/Jul/2025

Shiva optical