कोकण रेल्वेसंबधी मागण्यांसाठी खेडमध्ये १५ ऑगस्टला मोर्चा

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवास करणाऱ्या कोकणातील प्रवाशांच्या मागण्या कोकण रेल्वेने मान्य न केल्यास १५ ऑगस्टला खेड येथे आंदोलन करण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. याबाबत कोकण जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव म्हणाले, आम्ही मागील चार वर्षांहून अधिक काळ मध्यरेल्वे आणि कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत; मात्र, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही तसेच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

आमच्या काही मागण्या आहेत. त्यात मुंबई आणि चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअरकार व सामान्य अनारक्षित डबे असणारी व दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबणारी नवीन दैनिक गाडी सुरू करावी. रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करणे. एक्स्प्रेस गाड्यांचे डबे वाढवून ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी आरक्षित ठेवणे, अशा मागण्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 21/Jul/2025

Hotel waiter