किल्ल्यांवर धुडगूस घालणाऱ्यावर कारवाई करावी : वैभव सागवेकर

खेड : सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटनासाठी अनेक जणं किल्ल्यांना भेटी देत आहेत. मात्र ते गड-किल्ल्यांचे पावित्र न राखता हुल्लडबाजी करतात. या ठिकाणांचे पावित्र्य जपले जावे यासाठी प्रशासनाने धुडगूस घालणाऱ्या पर्यटकावर कारवाई करावी, अशी मागणी सुकीवली येथील वैभव सागवेकर यांनी केली आहे.

तालुक्यातील किल्ले रसाळगड, महिपतगड, सुमारगड असे किल्ले आहेत. अनेक पर्यटक किल्ल्यावर फिरण्यासाठी जातात. त्यांच्याकडून किल्ल्याचे पावित्र्य जपले जात नाही. पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. हे प्रकार महाराष्ट्रातील विविध गडकोटांवर सुरू आहेत. हे प्रकार निंदनीय असून या प्रकारांना वेळीच आळा घालण्यात यावा. तसेच गडावर जाऊन मद्यपान व धुम्रपान करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तरी स्थानिक प्रशासनाने असे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सागवेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 21/Jul/2025

Cake of the day