लांजा : लांजा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ माचाळ येथील परिसरामध्ये पंचायत समिती लांजाच्या वतीने विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांरी व ग्रामसेवक, सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माचाळ पर्यटन गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा, मुचकुंदी गुहा, पाणवठे, शाळा व लोकवस्ती नजदीक वृक्षांचे रोपण करण्यात आले. लांजा तालुक्यात मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले व व वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या माचाळ येथे गेली चार वर्षांपासून लांजा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना लांजा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळ परिसरात वृक्षलागवड करण्यात येत आहे. निसर्गाने परिपूर्ण असलेल्या माचाळकडे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सद्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात माचाळचे वातावरण येथील पर्यटनाला अधिक आकर्षक ठरत आहे.
त्यामुळे तालुका, जिल्हा यासह परजिल्ह्यातील पर्यटक माचाळच्या सानिध्यात रममान होताना दिसत आहेत. येथील घनदाट वनराई एक आकर्षणाचा केंद्र बिंदू असून माचाळच्या डोंगर खोऱ्यांमध्ये वृक्षांचे संवर्धन होणे काळाची गरज असल्याचा संदेश देत लांजा पंचायत समिती दरवर्षी माचाळ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबवत आहे.
लांजा पं.स. आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना लांजा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळ परिसरात नुकताच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माचाळ गावचे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, कृषी अधिकारी संतोष म्हेत्रे, नारायण कटरे, रोशनी जाधव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 21/Jul/2025














