संगमेश्वर : कळंबुशीत वीज धक्क्याने दोन गुरांचा मृत्यू

आरवली : कळंबुशी परिसरात शेतात कुंपण करून तारेत वीजप्रवाह सोडण्यात आला होता. या विजेच्या झटक्याने दोन गुरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी परिसरात शेतात कुंपण करून तारेत विद्युतप्रवाह सोडला होता. या वेळी कोणतीही काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे विजेचा धक्का लागून गुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 17/Oct/2024

Shree clinic