कोल्हापूर सर्किट बेंचमधून खेड, दापोलीसह मंडणगड तालुक्यांना वगळणे कठीण : अॅड. विलास पाटणे

खेड : नव्याने कोल्हापूर येथे सुरू होणाऱ्या सर्किट बेंचमधून खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील काही वकील तसेच काही नागरिकांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे. तसेच राज्य शासनाकडे तशी मागणी करण्यात त्रा आलेली आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खेडचे रहिवासी अॅड. विलास पाटणे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, भौगोलिकदृष्ट्या जरी या तालुक्यातील नागरिकांची आणि वकिलांची अशी मागणी असली, तरी तांत्रिकदृष्ट्या या तालुक्यांना खंडपीठातून वगळले जाईल, अशी शक्यता नाही.

कोल्हापूर बेंचसाठी सहा जिल्ह्यांची निवड झाली आहे, त्यात काही तालुक्यांना वगळणे शक्य होणार नाही. सर्किट बेंचच्या निर्मितीमुळे भौगोलिकदृष्ट्या काही तालुक्यांना मुंबईला जाणे-येणे हे सोपे जरी असले, तरी तांत्रिकदृष्ट्या जिल्ह्यातील काही तालुक्यांना वगळणे शक्य नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. याबाबत ना. योगेश कदम यांची काय भूमिका असेल आणि ते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 11/Aug/2025