रत्नागिरी : दोन वर्षांत नैसर्गिक अपघातात २३८ शेतकऱ्यांनी गमावला जीव

रत्नागिरी : शेतात काम करताना वीज पडून, उंचावरून पडणे, विषबाधा, पाण्यात बुडणे, सर्पदंश अशा विविध कारणांमुळे अपघात होतात ज्यात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. गेल्या दोन वर्षात अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील २३८ शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजनेंतर्गत आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटांमुळे अपंगत्व किंवा प्राणघातक अपघात झाल्यास शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजना राबविण्यात येते. या योजनेतून आर्थिक मदतीचा हात दिला जातो. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन लाख, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे पीडित शेतकरी कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळतो.

दोन शेतकऱ्यांना अपंगत्व
सन २०२४-२५ मध्ये दोन शेतकऱ्यांना अपंगत्व आहे. हे शेतकरी लांजा आणि राजापूर तालुक्यातील आहेत, तर सन २०२५-२६ मध्ये अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांची संख्या शून्य आहे.

१६ दावे
नामंजूर करण्यात आले आहेत. गत दोन वर्षांत विविध अपघातांत मृत्यू व अपंगत्व आलेल्या एकूण २३८ शेतकऱ्यांनी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, १६ शेतकऱ्यांचे दावे योग्य कागदपत्रांअभावी नामंजूर करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 23/Aug/2025