चिपळूण : ‘त्या’ कामगारांना थकीत रक्कमेपैकी अर्धी रक्कम अदा; उपोषणाला यश

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी येथील सुजाला इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक गजानन कदम यांनी कामगारांच्या थकीत सर्व रकमेपैकी अर्ध्या रकमेचा धनादेश कामगारांच्या स्वाधीन केला.

यानंतर रविवारी दुपारी उपोषण स्थगित करण्यात आले. खेर्डी औद्योगिक वसाहतीतील मे. सुजाला इंडस्ट्रीजमधील असंख्य कामगारांनी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर १५ ऑगस्टपासून उपोषण सुरू ठेवले होते. अधिकारी, उपोषणकर्ते व राजकीय पदाधिकारी यांच्यात चर्चा यशस्वी झाली. उर्वरित रक्कम गणेशोत्सवा आधी कदम यांनी देण्याचे ठरले. खेर्डी एमआयडीसी येथील मे. सुजाला इंडस्ट्रीज कंपनीने २८ वर्षापूर्वीचा कामगारांचा १४ महिन्यांचा पगार आणि थकीत रक्कम न देता कंपनी वॅनगार्ड लॅस्टला विकली.

वीजमंडळाने नव्या कंपनीला वीज कनेक्शन दिल्यामुळे देयक बाकी असलेल्या कामगारांनी संतप्त होऊन वीजमंडळ आणि मे. सुजाला इंडस्ट्रीज कंपनीचे मालक यांच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी पाग येथील वीजमंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले होते. रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 19/Aug/2025

Tata aeris