गुहागर : वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात Resume Building Competition संपन्न

अडूर : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात Placement Committee तर्फे विद्यार्थ्यांच्या करिअर घडविणाऱ्या Resume Building Competition या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर स्पर्धेत महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील कु. यश पेडणेकर याने उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा कु. समर्थ राणे व तृतीय क्रमांक कु. गौरवी तेरसे यांनी पटकाविले. या गुणवंतांचा यथोच्छित सन्मान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अविनाश पवार, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. हृषिकेश भावे, ग्रंथपाल डॉ. संतोष चतुर्भुज, महाविद्यालय समन्वयक हृषिकेश गोखले, प्रा.अनिकेत जाधव यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 19-08-2025