रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांना ‘रत्नभूषण पुरस्कार’ जाहीर

रत्नागिरी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आभार’ संस्थेचा आठवा ‘रत्नभूषण पुरस्कार २०२५’ पालकमंत्री उदय सामंत यांना जाहीर करण्यात आला आहे. सोहळा शनिवारी (ता. २३) सायंकाळी साडेतीन वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी दिली.

सोहळ्यात वयोवृद्ध भजन कलाकारांना ‘गुरूगौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मिलिंद आरेकर-बुवा कोतवडे, विनायक डोंगरे-आंबेशेत, गिरीशशेठ विचारे-राजापूर आणि विश्वास करगुटकर-आंबोळगड यांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 22/Aug/2025