रत्नागिरी जिल्ह्यातील ३२ धरणे तुडुंब

रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ धरणे १०० टक्के भरली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पणदेरी, तिडे, शिरसाडी, सोंडेघर, आवाशी, पंचनदी, शिरवली, कोंडीवली, गुहागर, पिंपर, फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, असुर्डे, तेलेवाडी, कडवई, रांगव, शीळ, शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, अर्जुना मध्यम प्रकल्प, बारेवाडी आणि चिंचवाडी ही सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. तसेच भोळवली, नातूवाडी मध्यम प्रकल्प, शेलारवाडी, गडनदी, ओझर, कोंड्ये आणि काकेवाडी धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. टांगर, पिंपळवाडी, तळवट, साखरपा, निवे आणि गडगडी ही धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

कळवंडे, पन्हळे, बेर्डेवाडी आणि तळवडे धरणांत आजही ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. मृग व जलसंधारण प्रकल्पात १६ धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सुकोंडी, शैलडी, शिवतर, कोसबी, मोर्डे, हर्दखळे, इंदवटी किंवा कोडगे, कुरंग, गोपाळवाडी, जुवाठी, वाटूळ, रेवली ही धरणे १०० टक्के भरली आहेत. कुरवळ, कशेळी आणि परुळे ही धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तिवरे, राजेवाडी आणि कोंडवाडी या धरणांत ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 22/Aug/2025