चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे पुलाला अतिवृष्टीमुळे तडा जाऊन वाहतूक बंद झाली आहे. रविवारी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या दुर्घटनेची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. पुलामुळे स्थानिक नागरिक, उद्योग आणि एमआयडीसीतील उद्योजकांना होणारा त्रास तत्काळ कमी व्हावा, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच पंधरा दिवसात टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही दिले खेडच्या पुलासाठी वापरलेली जलद बांधकाम तंत्रज्ञान वापरून हा पूलही त्वरित उभारण्याचे निर्देश दिले.
या पुलासाठी लागणारा अंदाजे ३४-३५ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी एमआयडीसीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मागील छोटा पूलही या योजनेत समाविष्ट करून दोन्ही पुलांची कामे पूर्ण केली जातील. तसेच एमआयडीसी परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 25/Aug/2025














