रत्नागिरी : जिल्ह्यात ९० टक्के पावसाची नोंद

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मागील पावणेतीन महिन्यांपासून पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत्त झाले होते. १ जून ते २४ ऑगस्ट दरम्यान आतापर्यंत ९० टक्के इतका पाऊस पडला आहे. एकूण पाऊस २७हजार २६५.२९ मि.मी. तर सरासरी ३ हजार २९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ९९ टक्के पाऊस झाला होता, तर सरासरी ३ हजार ३५१ इतका पाऊस झाला असून, मागील वर्षीपेक्षा यंदा ९ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे.

कोकणात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्वच्या पावसाने हजेरी लावली. कोकणात यापूर्वी इतका पाऊस मे महिन्यात कधीच झाला नव्हता. त्यानंतर जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जून ब जुलै महिन्यात पावसाने दमदार बंटींग केली. दोन्ही महिने कोकणासाठी लकी ठरले. जिल्ह्यात तब्बल ९८ टक्क्याहून अधिक भात, नाचणीच्या पेरण्या झाल्या आहेत. यापावसामुळे
कित्येक सार्वजनिक मालमत्ता, घरांची पडझड, व्यक्तीचा, जनावरांचा मृत्यू झाला. कित्येक ठिकाणी रस्ते खचली, दरड कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उसंती घेतली होती. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पर्जन्यमान १४ ते २५ टक्क्यापर्यंत कमी झाले होते.

दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्याला रेड झोनचा इशारा दिला यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील सहा नद्यांनी धोकादायक, इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे कोकणात पुरजन्यपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे शाळा महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर गुरुवारपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे नद्यातील पातळी कमी झाली व जनजीवन पूर्वपदावर आले. त्यामुळे गतवर्ष व यंदाच्या पर्जन्यमानात किंचीत फरक राहिला आहे. आता पावसाने विश्रांती घेतली असून दोन महिन्यानंतर आता सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे.

कोट्यावधीचे नुकसान
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेती, सार्वजनिक मालमत्ता, शाळा, घरे, गोठे, संरक्षक भिंत यासह कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे १०० हेक्टर शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून काहींना नुकसान भरपाई मिळाली आहे, तर काहींचे भरपाई कधी मिळणार याकडे लक्ष आहे.

जिल्ह्यातील नद्या फूल्ल
जिल्ह्यातील जगबुडी नदीत ४.८०, वशिष्ठी १.६०, शास्त्री नदीत ३.४०, सोनवी नदीत २.८० मीटर, काजळी नदीत १३.३९ मीटर, कोदवली नदीत ३.३० मीटर, मुचकुंदी नदीत १.१० मीटर, बावनदीत ५.६० मीटर इतकी पाणीपातळी आहे. सर्वच नद्या दुथडीभरून वाहत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 25/Aug/2025