रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून अपघात करत स्वतःच्या दुखापतीस तसेच ट्रकच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वा. सुमारास रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील गोळपधार येथे घडली आहे. सय्यद अन्सार पाशा (५०, रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, गुरुवारी रात्री तो आपल्या ताब्यातील ट्रक (केए-१६-एए-१४११) घेउन गोळप ते बेन्नूर कर्नाटक असा जात होता. तो रात्री १० वा. सुमारास गोपळधार येथे आला असता भरधाव ट्रकवरील त्याचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्याला दुखापत झाली असून ट्रकचेही नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 25/Aug/2025














