Ratnagiri Youth Death: रत्नागिरीतील भुतेनाका येथे अचानक फिट आल्याने तरुणाचा मृत्यू; जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना

Ratnagiri Youth Death: रत्नागिरीतील भुतेनाका येथे अचानक फिट आल्याने तरुणाचा मृत्यू; जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना

शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी: Ratnagiri Youth Death या दुर्दैवी घटनेत शहरातील भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. अक्षय शशिकांत आयरे (वय ३०, रा. फणसोप सडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी (ता. १२) रात्री बाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आयरे याला भुतेनाका रस्त्यावर अचानक फिट आली. त्यानंतर अलंकार आयरे यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच प्रकृती बिघडल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Yash siddhi2