रत्नागिरी : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे या योजनेत ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो. तरी अर्जदाराने विहीत नमुन्यात कागदपत्रासह अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत व किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाख राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 26/Aug/2025














