खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्माण कला संस्थेतर्फे खेड तालुक्यातील कला व संस्कृतीप्रेमींसाठी चित्रकला, मूर्तिकला, कराओंके गीत गायन व एकपात्री अभिनय अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
श्री गणेश चित्रकला स्पर्धा शालेय व खुला गट अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित केले जातील. तसेच श्री गणेश मूर्तिकला स्पर्धा मूर्तिकारांसाठी खुली असून यातही विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येईल.
गायन रसिकांसाठी कराओंके गीत गायन व एकपात्री अभिनय रिल व्हिडीओ स्पर्धा ‘गणेशोत्सव व समाजप्रबोधन’ या विषयावर आयोजित केली असून ती रत्नागिरी जिल्हा मर्यादित असेल. सर्व स्पर्धांसाठी ऑनलाईन नोंदणीची सोय असून, २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत नावनोंदणी करता येईल. एकपात्री अभिनयासाठी नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 26/Aug/2025














