Ratnagiri : कर्ला-आंबेशतमध्ये उद्या गणेश आगमन मिरवणूक

रत्नागिरी : कर्ला-आंबेशेत श्री गणेश आगमन (वैयक्तिक) मिरवणूक अतिशय भव्यदिव्य आणि क दिमाखदार उत्साही वातावरणात काढण्यात येणार आहे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून सकाळी ९.३० वाजता सुरुवात करून ती दुपारी ३ वाजता कर्ला-आंबेशेत गावी पोहोचेल. कर्ला-आंबेशेत मिरवणुकीमध्ये सुमारे १०० ते १२५ लहान-मोठ्या श्री गणेशमूर्ती विविध वाहनांवरून विविध पथके प्रारंभी ढोलताशे, झांजपथक, बागलकोटचे बॅण्डपथक, शिवशक्ती मित्रमंडळ आंबेशेत (घोसाळेवाडी) यांचे भजन मंडळ, कर्ला येथील गणराज महिला मंडळाचे लेझिम पथक तसेच संगम बिट्स, नाचणे सुपलवाडी यांचे ढोलपथक अशा दिमाखदार जल्लोषी वातावरणात दिसणार आहे.

या मिरवणुकीचा पाया ३० वर्षांपूर्वी शाहीर कै. मधुकर (आप्पा) सुर्वे यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली रचला गेला. कर्ला-आंबेशेत श्री गणेश आगमन मिरवणुकीचा मार्ग सालाबादप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळयापासून गोखलेनाका, श्रीरामआळी, एसटी स्टॅण्ड, सिव्हिल हॉस्पिटल, निवखोल घाटी, आदमपूर, राजीवडा, मारुती मंदिर कर्ला असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 26/Aug/2025