राजापूर : प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी आंबा-काजू बागायतदारांना चांगलाच फटका बसला आहे. अडीच महिने झाले तरीही ३६ हजार ४६८ बागायतदारांना विमा परताव्याची रक्कम मिळालेली नाही. यंदा मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसाने शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर पाणी फेरले गेले. या परिस्थितीत नुकसान भरपाई सोडाच, विमा परतावाही दिला न गेल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळावा म्हणून आंबा-काजू बागायतदारांसाठी केंद्र शासनाने विमा योजना लागू केली आहे. त्याचा फायदा गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ बागायतदारांनी सुमारे २ हजार ८५२ हेक्टर क्षेत्रावरील विमा उत्तरवला आहे. त्यात ३० हजार १३५ आंबा बागायतदारांनी १४ हजार ३८८ हेक्टरवरील तर ६ हजार ३३३ बागायतदारांनी काजूचा ३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्राचा विमा उत्तरवला आहे. जिल्ह्यातील १८ हजार ३४ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे.
आंबापिकाला यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस, त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी आणि अतिउष्मा या साऱ्या प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सतत कमी-जास्त राहिलेल्या दरामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हंगामाच्या शेवटी मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाने उरल्यासुरल्या आशांवरही पाणी फेरले गेले. आंबा बागायतदार आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. दुसऱ्या बाजूला काजूचीही तशीच स्थिती आहे. काजूला प्रतिकूल वातावरण, अवकाळी पाऊस या संकटांसह विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. काजूचे उत्पादन ग्रंदा मोठ्या प्रमाणात घटले. या प्रतिकूल स्थितीत कागायतदारांना विमा परताव्याचा मोठा आधार आहे. अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही विमा बागायतदारांना परताव्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावर्षीच्या प्रतिकूल हवामानाचा आंबा बागायतदारांना चांगलाच फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून बागायतदारांनी विमा उतरवला होता; मात्र, त्याचा शासनाकडून अद्यापही परतावा मिळालेला नाही- ओंकार प्रभुदेसाई, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 26/Aug/2025














