रत्नागिरी : समाजकल्याण आयुक्तालयाद्वारे शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट होती.
ती १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले. परिपूर्ण अर्ज https://fs.maharashtra. gov.in या वेबसाईटवर भरून त्याची प्रिंट व ऑफलाईन नमुन्यातील अर्ज समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाला १ सप्टेंबरपर्यंत सादर करावयाचा आहे. या विषयी अधिक माहितीसाठी www. maharashtra.gov.in शासनाच्या या संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या लिंकवर भेट द्यावी, असेही कळवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 29-Aug-2025














