Khed: भोस्ते घाटात एलपीजी गॅस टँकरला अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात भीषण अपघात घडला. जयगड वरून मुंबईच्या दिशेने जात असलेला एलपीजी गॅस कंटेनर (क्र. AP 31 TH 7652) अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रणाबाहेर गेला.

यावेळी वाहनाचे इंजिन बंद पडले व स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनर थेट समोरील गाड्यांवर आदळला.

समोर असलेली तवेरा कार (क्र. MH 05 AX 7768) ही गणपतीपुळे वरून रायगड दर्शनासाठी निघाली होती, तर वॅगनार कार (क्र. MH 05 AS 0057) चिपळूण वरून खेडच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांना कंटेनरने जबर धडक दिली. धडकेनंतर गॅस कंटेनर डिव्हायडरवर चढून दुसऱ्या बाजूला पलटी झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्था नानिजधाम यांच्याकडून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी 24 तास तत्पर असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले.

या अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सुदैवाने गॅस कंटेनरमधून गॅस गळती झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 01-09-2025