Vilas Rahate : रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सुपारीवर साकारले अष्टविनायक!

देवरुख : कलेमध्ये नेहमी आगळे वेगळे प्रयोग करणारे देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी गणेशोत्सवात गणपती बाप्पाची आराधना व सेवा अभिनव पद्धतीने केली आहे. त्यांनी नुकतीच अष्टविनायकातील ८ गणेश सुपारीवर साकारले आहेत.

गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त आणि विविध कलांचे चाहते असणाऱ्या विलास रहाटे यांनी गणरायाची स्थान असणाऱ्या छोट्याशा सुपारीवर अष्टविनायकाची मालिका तयार केली आहे. सुपारीवरील या आठ कलाकृतींमध्ये मोरेश्वर (मोरगाव), सिद्धेश्वर (सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महाड), चिंतामणी (थेऊर), गिरिजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या छबींचा चित्ररूपी समावेश आहे.

रहाटे यांनी या पूर्वी छोट्याशा तांदूळ अक्षतांवर गणरायाचे चित्र साकारले होते. विविध रांगोळी प्रकारातून, चित्रातून, माती कामातून, विविध साहित्यातील डिझाईनमधून त्यांच्याकडून नियमितपणे गणपती बाप्पांची सेवा होत असते. विलास रहाटे यांच्या नावावर जगातील छोट्या रांगोळीची नोंद जागतिक दर्जाच्या ७रेकॉर्डमध्ये यापूर्वी झाली आहे. विलास रहाटे यांच्या या वेळच्या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 01-Sep-2025