साईश्री बारजवळ निदर्शनास आला प्रकार
लांजा: Lanja Police Action या कारवाई अंतर्गत लांजा येथील कोरलेवाडी फाटा परिसरातील साईश्री बारजवळ दारूच्या नशेत आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री जयसिंग शिगवण (वय ६७, रा. गाणे माळवाडी, लांजा) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळून आल्यामुळे या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.














