khed : भोस्ते घाटात तिहेरी अपघात;११ प्रवासी जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात रविवारी (ता. ३१) दुपारी गॅस कंटेनरने दोन मोटारीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांतील ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

जयगडवरून मुंबईच्या दिशेने जात असलेला एलपीजी गॅस कंटेनरचा अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे तो रस्त्यातच बंद पडला. स्टिअरिंग लॉक झाल्यामुळे त्या टँकरने समोरून जाणारी मोटार आणि विरुद्ध दिशेने येत असलेली चारचाकी या दोन गाड्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात मोटारीतील प्रवासी गणपतीपुळेवरून रायगड दर्शनासाठी जात होते. तर चारचाकीतील प्रवासी चिपळूणहून खेडच्या दिशेने येत होते. या अपघातानंतर गॅस कंटेनर दुभाजकावरून पलीकडे उलटला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामध्ये कारमधील ७ तर चारचाकीतील ४ असे ११ प्रवासी जखमी झाले होते. त्यांना जगगुरू नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 01-Sep-2025