चिपळूण : एलपीजी गॅस ग्राहकांना नियमित सिलिंडर भरती (रिफिल), तसेच अनुदानाची (सबसिडी) रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यांतील गॅस ग्राहक तसेच चिपळूण येथून गॅस जोडणी (कनेक्शन) घेतलेले परंतु सध्या पुणे-मुंबई येथे वास्तव्यास असलेले ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकांशी संपर्क साधून तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
ई-केवायसी न झाल्यास ग्राहकांना गॅस रिफिल मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यात विलंब किंवा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या वितरकाकडे त्वरित ई-केवायसी कदम करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 01-Sep-2025














