दापोली : मैत्री एकीबरोबर आणि साखरपुडा दुसऱ्या मुलीशी करण्याचा प्रकार जिल्ह्यातील एका तरूणाला भोवला असून संतापलेल्या त्या मैत्रिणीने पोलिस ठाण्यात ‘त्या’ तरुणाविरोधात तक्रार दाखल दिली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणाची एका मुलीशी ओळख झाली. दरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने तिला माझ्याची लग्न करशील का? असेही विचारले होते. एकदा तिला जेवणासाठी बाहेर नेले होते. त्यावेळी तिच्याशी गैरवर्तन केले.
मात्र त्या मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मी तुझा होणारा नवरा असून तुझे फोटो मला पाठव, असे सांगत त्या मुलीकडे शरीरसंबंध ठेवण्याचा हट्ट धरला. त्याला नकार दिला होता. २७ ऑगस्टला तरुणाने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याचे फोटो संबधित मुलीने पाहिल्यावर ती प्रचंड नाराज झाली. तिने पोलिस ठाण्यात त्या तरुणाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 01-Sep-2025














