Ratnagiri : चक्कर येऊन पडलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : चक्कर येऊन पडलेल्या वृद्धाला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकाश शंकर खाडे (वय ६०, रा. टेंभे, सध्या हातीस, पो. तोणदे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश खाडे हे शुक्रवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास बाथरुमला जात असताना चक्कर येऊन पडले. हे धोंडू नागवेकर यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 01-Sep–2025