ST BUS : परती प्रवासाठी चिपळुणातून ३०० बसेस

चिपळूण : गणेशोत्सवासाठी चिपळूण तालुक्यात आलेल्या गणेशभक्तांसाठी एसटी आगाराने ३०० बसेस उपलब्ध करून ठेवल्या आहेत. २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणांवरून मुंबई, पुणे शहराकडे परतणार आहेत, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणकर मोठ्या संख्येने गावी दाखल झालेले आहेत. यंदा ६०० जादा एसटी बसेसमधून सुमारे ३५ हजार प्रवासी चिपळूणमध्ये आल्याचा अंदाज आहे. दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करून काही माघारी परतले. बहुसंख्य ५ दिवसांचे गणेश विसर्जन करून जाणार आहेत. त्यासाठी आगाराने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. चिपळूण बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानक येथून २३० एसटीच्या फेऱ्या मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल आदी शहरांकडे जाणार आहेत. तालुक्यातून ७० ठिकाणाहून ग्रुप बसची आरक्षण झालेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 01-Sep-2025