देवरुख : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संगमेश्वर तालुक्यातील शिवने गवळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. कोल्हापुरातून मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येण्याच्या तयारीत असलेल्या भोजने कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला. घरात झालेल्या गॅसच्या स्फोटात शीतल अमर भोजने यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या दोन चिमुकल्या लेकरांना आईचा आधार कायमचा गमवावा लागला आहे.
गॅस पाईपलाईनमधील गळतीमुळे खोलीत अचानक स्फोट झाला. या स्फोटात शीतल भोजणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पाच वर्षांच्या प्रज्वल आणि तीन वर्षांच्या इशिका या दोन बालकांना आईविना पोरके होण्याची वेळ आली. या घटनेत प्रज्वल आणि इशिकाही जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
या घटनेत आजोबा अनंत भोजने (६०) यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. अमर भोजने हे गेली चार वर्षे कुटुंबासह कोल्हापुरात वास्तव्यास होते. ते एलआयसी कॉलनीजवळील एका भागात राहत होते आणि हटिलमध्ये कुक माणून काम करत होते.
भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जोडणी अर्धवट अवस्थेत होती. घराबाहेर खिडकीजवळ गैस मीटर बसवण्यात आला होता. मात्र, गॅस सुरु झाला होता, याची कल्पना कुटुंबाला नव्हती. रात्री शीतल यांनी जेवण गाम करण्याचा प्रयत्न करताच अचानक स्फोट झाला,घटनेची माहिती मिळताच शिवने गवळवाडी गावातील ग्रामस्थांनी कोल्हापुरात धाव घेतली. सरपंच राजू पवार यांनी त्यांच्या नातेवाइकांकडे कुटुंबाची विचारपूस केली आणि ग्रामपंचायतीमार्फत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ही घटना अवघ्या गावासाठीच नव्हे तर कोकणात गणेशोत्सवाच्या सणात रंगलेल्या प्रत्येकासाठी धक्कादायक आहे. दोन चिमुकल्या जीवांनी आई गमावली, तर एका पित्याने पत्नी आणि वृद्ध वडिलांच्या जीवनासाठी धडपड सुरू ठेवली आहे. या कुटुंबाला सावरण्यासाठी शासन आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
एका निर्णयाने कुटुंबाचे आयुष्यच बदलले
गणेशोत्सवासाठी कुटुंबाने मूळ गावी जाण्याचा बेत आखला होता. मात्र, अमर पांची रात्रपाळीची ड्यूटी असल्याने ‘एक रात्र थांबून सकाळी निषू, असा निर्णय घेतला गेला. या एका निर्णयानेच त्यांचं आयुष्य बदलून टाकले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:52 PM 01-Sep-2025














