Dapoli : वडाचाकोंड येथे श्री केशवराज मंदिराची प्रतिकृती

दापोली : तालुक्यातील वडाचाकोंड येथील रेमजे परिवाराने आसूद गावातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या श्री केशवराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. धार्मिकतेबरोबरच भावलेली आहे. संगम घडवणारी रेमजे परिवारातर्फे गेल्या सव्वाशे वर्षांपेक्षा एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

आतापर्यंत या कुटुंबाने ‘ग्लोबल वॉर्मिंग’, ‘व्यसनमुक्ती’, ‘दहशतवादविरोधी हल्ले’, ‘ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण’ यांसारखे सामाजिक विषय मांडले आहेत तर ‘समुद्रमंथन’, ‘विष्णू अवतार’, ‘श्रीराम अवतार’, ‘श्रीकृष्ण अवतार’ अशा पौराणिक प्रसंगांचे देखावे उभारून भक्तांची मने जिंकली आहेत. यंदा उभारलेल्या श्री केशवराज मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये सूक्ष्म तपशिलांपासून परिसरातील निसर्गसौंदर्यापर्यंत बारकाईने चित्रण करण्यात आले आहे. या कलाकृतीमुळे जणू भक्त आसूद गावातल्या मंदिरातच दर्शन घेत आहोत, असा भास होतो. देखाव्याची कल्पना आणि रचना अमित रेमजे यांची असून, त्यांना पंकज, विजय, प्रदीप, दीपक, रूपेश, सिद्धेश तसेच बालकलाकार दिव्या व अवनी यांची साथ लाभली. वसंत, प्रकाश, मारुती आणि अनंत रेमजे या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला योग्य आकार मिळाला.

गेल्या १५० वर्षांपासून आमच्या रेमजे कुटुंबाची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. ती परंपरा जपत आम्ही दरवर्षी नवनवीन सामाजिक व पौराणिक विषयांवर देखावे उभे करतो. यावर्षी श्री केशवराज मंदिराची प्रतिकृती साकारून श्रद्धा आणि पर्यटन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:42 PM 01-Sep-2025