sangameshwar : साहील आंबवकरने साकारला कोकण रेल्वेचा देखावा !

कडवई : कोकणातील गणेशोत्सव आपले वेगळेपण जपत आलेला आहे. गणेशोत्सवात तरुणांच्या अंगभूत कलांनाही वाव मिळतो. गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेश भक्त गणेशासमोर वेगवेगळे देखावे सादर कारणाचे काम करतात. अशीच आपली कला सादर केली आहे संगमेश्वर (नावडी) येथील युवा उपक्रमशील गणेश भक्त साहील सुनील आंबवकर याने यावर्षी कोकण रेल्वेचा देखावा साकारून संगमेश्वरकरांची मने जिंकण्याचे काम केले आहे. त्याने देखाव्यामध्ये रेल्वेस्टेशन, बससेवा, उक्षीचा धबधबा, उक्षी बोगदा व सह्यादीचा निसर्गरम्य परिसर इत्यादी दृश्ये दाखवली आहेत.

यासाठी त्याने एक महिना कुटुंबीयांच्या सहकार्यान मेहनत घेतली. त्याला मित्र सुशांत भोसले, अकील जाधव व धनश्री अश्या मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ‘स्वगपिक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण’ असा संदेश साहीलने या देखाव्यातून दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 02-Sep-2025