Lanja : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याकडून अडीच लाखाचा दंड वसूल

लांजा : येथे बेशिस्तपणे वाहन चालवणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६६ वाहनचालकांवर ऑगस्ट महिन्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये २ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने दुतर्फा असलेल्या अरुंद रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. त्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट महिन्यात सहायक फौजदार साक्षी भुजबळराव व पोलिस शिपाई किशोर पवार यांनी ३६६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. एका महिन्यामध्ये २ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:16 PM 03-Sep-2025