Rajapur News: रायपाटणच्या विठ्ठल-रुखमाई मंदिरात २० नोव्हेंबरपासून कार्त्तिकी उत्सवाची पर्वणी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Rajapur News: रायपाटणच्या विठ्ठल-रुखमाई मंदिरात २० नोव्हेंबरपासून कार्त्तिकी उत्सवाची पर्वणी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मंदिरांचे गाव म्हणून परिचित असलेल्या रायपाटणमध्ये तीन दिवसीय सोहळा

राजापूर: मंदिरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायपाटण येथील पुरातन श्री विठ्ठल-रुखमाई देवस्थानात कार्त्तिकी उत्सवानिमित्त २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नित्यपूजा, कीर्तन, भजन, शालेय विद्यार्थ्यांची दिंडी, वारकरी दिंडी, महाप्रसाद आणि गोपालकाळा अशा कार्यक्रमांची भक्तीमय मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे.

या उत्सवानिमित्त त्रिदिनात्मक धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे असणार आहे:

शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६:

Arihant 3

सकाळी ८ वाजता: नित्यपूजा

रात्री ८ वाजता: आरत्या व भोवत्या

रात्री १० वाजता: ह.भ.प्र. गिरजा करंबळकर यांचे कीर्तन

शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६:

सकाळी ८ वाजता: नित्यपूजा

सकाळी ८.३० वाजता: शालेय विद्यार्थ्यांची दिंडी

सायंकाळी ५ वाजता: ह.भ.प्र. गिरजा करंबळकर यांचे कीर्तन

रात्री ९ वाजता: वारकरी दिंडी

रात्री १० वाजता: आरत्या व भोवत्या

रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ (समापन दिन):

सकाळी ८ वाजता: नित्यपूजा

दुपारी १ वाजता: महाप्रसाद

सायंकाळी ५ वाजता: कीर्तन

६ वाजता: गोपालकाला

रात्री १० वाजता: आरत्या व भोवत्या

रात्री ७ वाजता: लळीत कीर्तनाने उत्सवाची सांगता

या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये संवादिनीवर सतीश करंबळकर व गणेश लले, तर तबल्यावर प्रशांत जोशी सहसंगत करणार आहेत. गावातील श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर पुरातन असून सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. या उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.