चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे दोन फ्लॅट बुक करून दोन वर्षे उलटली तरी सदनिकेचा ताबा दिला नाही. या प्रकरणी खरेदीदारांची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक सखाराम सावर्डेकर (रा. सावर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दिगंबर शंकर सावर्डेकर (रा. अंधेरी-मुंबई) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक सावर्डेकर यांची सावर्डे येथे कन्स्ट्रक्शन फर्म आहे.
दिगंबर सावर्डेकर यांना त्यांच्या ओळखीच्याने दोन फ्लॅट बुकिंग करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून दीपक सावर्डेकर यांने कोणतीही कागदपत्रे तयार न करता फिर्यादी दिगंबर सावर्डेकर व पत्नी शर्मिला सावर्डेकर यांच्याकडून सदनिकेकरिता २१ लाख रुपये घेतले आहेत. २०२३ ते २०२५ या कालावधीत हे व्यवहार झाले; मात्र ठरलेल्या मुदतीत सदनिका उपलब्ध झाली नाही. शिवाय फ्लॅट बुकिंगकरिता गुंतवलेले २१ लाख रुपये परत न देता पत्नीची देखील फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 04/Sep/2025












