दापोली : दिवसेंदिवस शहरात तसेच ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हे कुत्रे नागरिकांवरही हल्ला करत असल्याने त्यांची भीती निर्माण झाली आहे. रस्तोरस्ती हे कुत्रे भटकत असून दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर जाणे व चावा घेणे, आदी प्रकार वाढले आहेत. प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:58 PM 06-Sep-2025












