गुहागर : शृंगारतळी गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर अलिकडे मोकाट गुरांनी ठिय्या मांडलेला दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. मोकाट गुरांच्या रस्त्यावरील वावराने या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत मोकाट गुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थानिक प्रशासनानेही यावर अनेक उपाययोजना राबविल्या; मात्र त्या फोल ठरल्या आहेत.
कोंडवाडे, गुरे मालकांना दंड असे उपायही करुन पाहिले; मात्र दिवसेंदिवस मोकाट गुरांचा उपद्रव सुरुच आहे. नोटीसा बजावूनही गुरे मालक दाद देत नाहीत. शृंगारतळी-गुहागर हा नेहमीचा वर्दळीचा मार्ग आहे. भरधाव वाहने ये-जा करत असतात. अशावेळी दाटीवाटीने रस्त्यावर ठाण मांडून बसलेली मोकाट गुरे दिसून येतात. कधी कधी गुरांच्या पायाचे खूर, किंवा इतर भागाला वाहनाच्या धडकेने जखमही झाल्याचे प्रकार घडले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 09/Sep/2025













