Ratnagiri : पावसाची विश्रांती; सप्टेंबरमध्येच जाणवतेय ऑक्टोबर हीट, नागरिक हैराण !

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शहर जिल्ह्यात कडक उन्ह पडत आहे. दिवसा अंगाला चटके बसत असून जास्त उकाडा जाणवत असल्यामुळे रत्नागिरीकर हैराण झाले आहे. ऑक्टोबरचे हिट सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरीकर छत्री घेवून, तोंडाला मास्क, रूमाल, डोक्याला रूमाल बांधून बाहेर पडत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्यामुळे तीन महिन्यात पाऊसफुल्ल झाले आहे. त्यानंतर अनंत चतुर्थीदिवशी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. कधी उन्ह, कधी ढगाळ वातावरण होत होते. मात्र आता कडक उन्ह पडत असल्यामुळे उन्हाळाच जाणवू लागला आहे. ऑक्टोबरमध्ये जशी हिट असते तशी हिट सप्टेंबरमध्येच जाणवू लागली आहे. अंगावर चटके बसत असून मोठ्या प्रमाणात घाम येत उकाड्याने असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

रत्नागिरी शहर, जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच पावसामुळे रस्त्यांची वाट लागली होती. आता त्या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात धुळ येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 11/Sep/2025