रत्नागिरी : ओणी ते कोल्हापूर जाणाऱ्या रायपाटण गाव येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भालचंद्र नारकर (५३, रा. पाचल, नारकरवाडी, राजापूर) व अविनाश शंकर तोडकरी (वय ५१, रा. रायपाटण सनगरवाडी, ता. राजापूर) अशी संशयित वाहनचालकांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता.९) दुपारी साडेचार ते सव्वापाचच्या सुमारास ओणी ते कोल्हापूर जाणाऱ्या रायपाटण गावातील रस्त्यावर निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वाहनचालक सुनील नारकर यांनी रिक्षा रायपाटण येथील वडचाई गॅरेज रस्त्यावर तर अविनाश तोडकरी यांनी रिक्षा या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, अशा पार्क केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रामदास पाटील व रामकृष्ण कात्रे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 11/Sep/2025













