रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी भगवती किल्ल्यावजवळील ब्रेक वॉटर समोरील समुद्रात जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटून बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास मिळून आला. अनामुल इस्लाम तालुकदार (२५, रा. मुळ रा. सोनापूर आसाम सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे.
याबाबत शब्बीर अलीसाहेब मजगावकर (रा. मधला मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, त्यांच्या मालकीची अमिना आयश बोट ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास भगवती किल्ल्याजवळील ब्रेक वॉटर समोरील समुद्रात जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटली होती. त्यातील इतर खलाशांसह अनामुल तालुकदारही समुद्रात पडून बेपत्ता झाले होते. दरम्यान, त्यांचा स्थानिक बोटींच्या सहाय्याने समुद्रात शोध सुरु असताना बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास त्यांचा मृतदेह बोट उलटलेल्या ठिकाणीच पाण्यात तरंगाताना मिळून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 12/Sep/2025













