Chiplun: चिपळूणच्या तिघींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

चिपळूण : रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मयूर कांबळे बॅडमिंटन अॅकॅडमीतील विश्वा गमरे, आदिती जावरट व मैत्राई तारे यांनी १४ वर्षांखालील मुलीच्या सांघिक प्रकारात विजेतेपद पटकावले. त्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रिया पेढामकर, सई शिंदे, स्वरा होमकलस यांनी १७ वर्षांखालील मुली टीम इव्हेन्ट प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये १४ वर्षांखालील मुलींमध्ये विश्वा गमरे, तर १७ वर्षांखालील मुलींमध्ये रिया पेढामकरची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 13/Sep/2025