रत्नागिरी : पितृपक्षात मांसाहार वर्ज्य असतो. त्यामुळे मासळीला प्रथम पसंती असते, परंतु मोठ्या आणि चवदार मासळीचे दर आवाक्यात नसल्याने बाजारपेठेतील मुख्य मासळी मार्केटमध्ये रविवारी शुकशुकाट होता. मात्र, ज्याठिकाणी मासळी उतरते त्या बंदरांजवळ असलेल्या राजीवडा आणि मिरकरवाडा येथील मासळी बाजारात ग्राहकांची बर्यापैकी गर्दी होती.
पारंपारिक, पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. दोन्ही नौकाना मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे माशांचे दर अजूनही आवाक्यात आलेले नाहीत. त्यामुळे पितृ पंधरवड्यात मासळीची मागणी वाढती असली तरी खिशाला परवडणारी नाही. रविवारी छोटी सुरमई 200 रुपये, तर मोठी सुरमई 600 रुपये किलो दराने मिरकरवाडा बंदरावर विकली जात होती. छोट्या सुरमईला ग्राहकांची फारशी पसंती नसते. बांगडे मात्र स्वस्त म्हणजे 80 रुपये किलो दराने मिळत होते. मोठ्या सौंदाळ्यांचा किलोचा दर 250 रुपये, तर लहान सौंदाळे 200 रुपये किलो दराने मिळत होते. छोटे सरंगे 250, तर मोठे सरंगे 600 ते 700 रुपये किलो दराने मिळत होते. लहान किंवा चालू कोळंबीचा किलोचा दर 350 रुपये, तर टायनी जातीची कोळंबी बंदरावर 500 रुपये किलो दर तर छोटे पापलेट 450 रुपये तर मोठे पापलेट 1200 रुपये दराने मिळत होती.
बाजारपेठेतील मुख्य मासळी मार्केटमध्ये बंदरावरून आणलेली मासळी किलोला 50-100 रुपये मिळतील या दराने विकली जाते. त्यामुळे या मार्केटमधील दर पाहणारे ग्राहक राजीवडा आणि मिरकरवाडा बंदराजवळील मासळी बाजारात जात होते. उघड्यावर भरणार्या या मासळी बाजारात खवय्यांची बर्यापैकी गर्दी होती. याठिकाणच्या बंदरांवर उतरणारी मासळी तिथल्या तिथेच विकायची असल्याने ती मासळी मार्केटच्या दरापेक्षा कमी दराने मिळते.
प्राध्यापक पद भरतीच्या प्रक्रियेवरून अडचणी होत्या. राज्यपालांनी ही भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी. त्यासाठी प्रक्रियेत बदल सुचविले होते. आता लवकरच प्राध्यापकांची ८० टक्के रिक्त पदे लवकरच भरली जातील असे फडणवीस यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 15-09-2025














