Ratnagiri, Rain: रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस परतीच्या मार्गावर

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाळी वातावरण असून पावसाच्या सरी थांबूनथांबून पडत होत्या. हवेत गारवा दाटून आला होता. पहाटेच्यावेळी धुके पडत असल्याने, पाऊस लवकरच परतीच्या मार्गावर असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. दिवसभर पावसाच्या सरी थांबून पडत होत्या. मंगळवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली असली तरी दिवसभर आकाश

भरलेले होते. रत्नागिरीत दुपारच्यावेळी पावसाने हजेरी लावली होती. परंतु सरींना जोर नव्हता. गेले दोन दिवस ग्रामीण भागासह किनारपट्टीवरही धुके दाटून आले होते. त्यामुळे पावसाने परतीचा प्रवास सुरु केल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. नवरात्रही जवळ येत असून भात पिकांना आता लोंब्या डोलू लागल्या आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यात ११७ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी पावसाने शंभरी ओलांडली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 17-09-2025