Chiplun : वडघर येथे २८, २९ सप्टेंबरला निसर्गानुभव कार्यशाळा

चिपळूण : जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्रातर्फे २८ व २९ सप्टेंबर रोजी निसर्गानुभव कार्यशाळा माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रसिध्द जैवविविधता तज्ज्ञ पार्थ बापट हे या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.

या निसर्गानुभव कार्यशाळेचा कालावधी २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ पर्यंत असणार आहे. या कार्यशाळेत परिसर भ्रमंती (वृक्ष वेली, प्राणी पक्षी यांची ओळख), निसर्ग खेळ/उपक्रम (जैवविविधता व माणूस यातील संबंध), पर्यावरण-संगीत (पर्यावरणाचे जतन संवर्धन), माहितीपट प्रदर्शन, चर्चा व गप्पांचा समावेश आहे. १२ ते ५५ वयोगटातील व्यक्तींना या कार्यशाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. या निसर्गानुभव कार्यशाळेच्या संपर्कासाठी चिंतामणी, राहुल यांच्याकडे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 17/Sep/2025

Shoping fest Khabardar