Cyclone Shakti : सावधान! येतंय ‘शक्ती’ चक्रीवादळ.. राज्यात पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Shakti : राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सून संपल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान दिसून येऊ शकतो.

हवामान विभागााने मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग यासारख्या महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे ४ ते ५ ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यांमध्ये ४५-६५ किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना इशारा

Tata safari

आयएमडीनुसार, वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. यामुळे समुद्राच्या मोठ्या येऊ शकतात. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांसह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

सरकारने अलर्ट दिला

मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागात पूर परिस्थिती येऊ शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर वादळासह मुसळधार पाऊस आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ ‘शक्ती’ला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांमधील मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 04-10-2025