Bacchu Kadu : निवडणूक आयोगाचं काम भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Bacchu Kadu : निवडणूक आयोग (Election Commission) भाजपच्या (BJP) कार्यालयातून चालत असल्याची टीका प्रहाश जशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली. झेंडा एक असला तरी अजेंडा काय? काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. भाजप काँग्रेसला बिहार देऊ शकते आणि मुंबई ताब्यात घेऊ शकते. ईव्हीएमचा प्रताप दाखवू शकते असे मत कडू यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरीत (Ratnagiri) बोलत होते.

देवाभाऊ सातबारा कोरा करतो असं बोलले होते, एकदा तरी कोरा करा

ईव्हीएम मशीन काँग्रेसने आणली नसती तर आमच्या मते हे पाप नसतं आलं. त्यांनी चूक केली. ईव्हीएम मशीन ठेवा पण बॅलेट पेपर प्रमाणे. आम्हाला सगळी माहिती द्या. मोदीजी रामचंद्राचे भक्त असतील तर त्यावर आमचे नाव आणि क्रमांक पण असेल असे कडू म्हणाले. देवाभाऊ सातबारा कोरा करतो असं बोलले होते. एकदा तरी कोरा करा असे बच्चू कडू म्हणाले. अमेरिकेने एक किडा आहे म्हणून आंबा परत पाठवला. अमेरिकावाले 108 किडे पाठवते तरी आम्ही सफरचंद घेतो. मोदीजी 56 इंचवाले आहेत, सत्तेत आहेत पण झुकतात असे कडू म्हणाले.

आपणच भांडत राहिलो व सरकारसोबत कोण भांडणार

देश जाती पातीत अडकवलेला आहे. तुम्हाला आम्हाला त्यामध्ये अडकवून ठेवले आहे. आपणच भांडत राहिलो व सरकारसोबत कोण भांडणार असे कडू म्हणाले. सगळ्या गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी कराव्या लागतात असे कडू म्हणाले. जे तुकाराम यांनी सांगितलं ते पैगंबर यांनी सांगितलं. जातीसाठी रत्नागिरीला आलो असतो तर रत्नागिरी फुल्ल झाले असते असेही कडू म्हणाले. एकदा एका मंत्र्याच्या घरात गेलो. घर ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला. घर सोडा. मी बोललो घर सोडतो आणि तुमच्या घरात शिरतो. त्यानंतर लगेच निर्णय झाल्याचे कडू म्हणाले.

राणेला कोण ओळखतो?

राणेला कोण ओळखतो? असा टोला कडू यांनी लगावला. नाव देवाभाऊ आहे. देवासारखे पावेल असं वाटलं होतं असा टोला कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला. आम्ही 6 हजार घेतल्याशिवाय राहणार नाही असेही कडू म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 13-10-2025