रत्नागिरीत भक्तीचा जागर! श्री राधाकृष्ण मंदिरात १८ मे पासून ‘अधिक ज्येष्ठ मास’ निमित्त कीर्तन सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील श्री राधाकृष्ण नाका येथील प्रसिद्ध श्री राधाकृष्ण मंदिर (वैश्य संस्था) येथे अधिक ज्येष्ठ मास (पुरुषोत्तम मास) शके १९४८ निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रविवार, दिनांक १७ मे २०२६ ते रविवार, दिनांक १४ जून २०२६ या महिनाभराच्या कालावधीत मंदिरात विविध टप्प्यांत अध्यात्मिक सोहळे साजरे केले जाणार आहेत. यामध्ये सोमवार, १८ मे पासून भव्य ‘कीर्तन सप्ताह’ सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन शामकांत मलुष्टे यांनी दिली आहे.

महिन्याचा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम खालीलप्रमाणे:

अधिक मासाच्या काळात मंदिरात दररोज सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा व अभिषेक आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे.

  • १७ मे २०२६ (रविवार): पुरुषोत्तम मासाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा, अभिषेक व आरती होईल. दुपारी १२ वाजता उदय मेस्त्री आणि सहकाऱ्यांच्या ‘समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळ्ये बुवा’ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम व नैवेद्य होईल.
  • २० मे २०२६ (बुधवार): श्री राधाकृष्ण गाभाऱ्यात आंब्याची आकर्षक आरास (आमराई) करण्यात येईल.
  • २५ मे २०२६ (सोमवार): सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नाचणे यांच्यातर्फे ‘संक्षिप्त भागवत पारायण’ होईल.
  • २७ मे २०२६ (बुधवार): सायंकाळी ५ ते ७ या वेळेत बावनदी महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल.
  • २८ मे २०२६ (गुरुवार): सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री शंकर महाराज मठ यांच्या वतीने श्री राधाकृष्ण चरणी विशेष प्रार्थना केली जाईल.
  • २९ व ३० मे २०२६ (शुक्रवार व शनिवार): सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ‘इस्कॉन’ (हरे राम हरे कृष्ण) समूहातर्फे भव्य सत्संग सोहळा रंगेल.
  • ३१ मे २०२६ (रविवार): सकाळी १० वाजता ‘३३ श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करण्यात आली असून, दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद होईल.
  • २ जून ते ८ जून २०२६ (मंगळवार ते सोमवार): सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सौ. अंजली दीपक बर्वे यांच्या अभ्यासपूर्ण वाणीतून ‘भागवत सप्ताह’ साजरा होईल.
  • ९ जून २०२६ (मंगळवार): सकाळी ८ वाजल्यापासून ‘विष्णू याग’ सुरू होईल, त्यानंतर दुपारी आरती व महाप्रसाद वाटप होईल.
  • १४ जून २०२६ (रविवार): अधिक मासाच्या सांगतेनिमित्त दुपारी १२ वाजता श्री राधाकृष्णाला ‘५६ भोग’ अर्पण केले जातील. त्यानंतर दुपारी आरती व महाप्रसाद होईल.

१८ ते २४ मे २०२६: सुश्राव्य कीर्तन सप्ताह

अधिक मासाचे मुख्य आकर्षण असलेला कीर्तन सप्ताह दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडेल. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यामध्ये आपली सेवा रुजू करणार आहेत:

दिनांक आणि वारकीर्तनकारांचे नाव
१८ मे २०२६ (सोमवार)ह.भ.प. सौ. स्पृहा वैद्य चक्रदेव
१९ मे २०२६ (मंगळवार)ह.भ.प. कु. यश सोवनी
२० मे २०२६ (बुधवार)ह.भ.प. सौ. सायली मुळ्ये दामले
२१ मे २०२६ (गुरुवार)ह.भ.प. श्री. कैलास खरे
२२ मे २०२६ (शुक्रवार)ह.भ.प. कु. अमृता नवाथे
२३ मे २०२६ (शनिवार)ह.भ.प. कु. मयुरेश जायदे
२४ मे २०२६ (रविवार)ह.भ.प. सौ. रमा ठाकूर

अभिषेक आणि महापूजेसाठी नोंदणी आवाहन

या पर्वकाळात भाविकांना विविध पूजेमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • दररोजचा अभिषेक: रोजच्या अभिषेकासाठी नाव नोंदणी करण्यासाठी श्री. सुशिल मलुष्टे (मोबाईल क्र. ९५६१०५६४४४) यांच्याशी संपर्क साधावा.
  • ३३ श्री सत्यनारायण महापूजा: ३१ मे रोजी होणाऱ्या ३३ श्री सत्यनारायण महापूजेमध्ये बसण्यासाठी भाविकांनी आपली नावे २५ मे २०२६ पूर्वी श्री. संतोष जयवंत रेडीज (मोबाईल क्र. ८४५९८५४४२८) यांच्याकडे नोंदवणे बंधनकारक आहे.

श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन शामकांत मलुष्टे आणि समस्त पदाधिकारी यांनी रत्नागिरीतील सर्व आबालवृद्ध, महिला आणि भाविक भक्तांना या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून या अपूर्व आनंदपर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.