Maharashtra Local Body Elections : नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?

Maharashtra Local Body Elections : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आजपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती असणार आहे, याबाबतची माहिती देखील निवडणूक आयोगानं दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती असणार?

निवडणूर आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा देण्यात आली आहे. तर क वर्ग नगरपालिकांसाठी सदस्यांसाठी 7 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी नवीन अँप देखील आणण्यात आले आहे.
दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. दुबार मतदारच्या समोर डबल स्टार आलेलं आहे. तो मतदार कुठल्या मतदार केंद्रात मतदान करेल याची माहिती मिळणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. ज्या मतदाराच्या नावावर डबल स्टार असेल त्याच्याकडून कुठे मतदान केले याबाबबतची माहिती घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोदाने दिली आहे.

पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार

राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक

कोकण – 17

नाशिक -49

पुणे -60

संभाजीनगर -52

अमरावती -45

नागपूर -55

कसे असेल निवडणुकीचे वेळापत्रक?

नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर

छाननी – 18 नोव्हेंबर

अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर

मतदान – 2 डिसेंबर

निकाल – 3 डिसेंबर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 04-11-2025