संगमेश्वर : कडवई-कोल्हापूर एसटी बस सुरू करण्याची मागणी

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील महसुली मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे कडवई हे गाव ग्रुप ग्रामपंचायतीचे केंद्र आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कडवई, विकास नगर आणि शिंदे आंबेरी या तीन गावांचा समावेश आहे. या परिसरातील अनेक कुटुंबे कोल्हापुरात वास्तव्यास असून, ते नियमितपणे गावात ये-जा करतात. त्यामुळे कोल्हापूर – कडवई एसटी बस सुरू करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. अनेक वर्षांपूर्वी माखजन-कोल्हापूर व्हाया कडवई अशी एसटी बस सेवा चालू होती; मात्र ही बस बंद करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 24/Oct/2024